कोरोनाकाळात ख्रिस्त्यांकडून होणारे धर्मांतर हा मानवतेसाठी कलंक ! – महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज, श्री अखंडानंद आदिवासी गुरुकुल आश्रम, इंदूर
हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
‘चर्चा हिंदु राष्ट्राची ! या विशेष परिसंवादांतर्गत ‘कोरोना संसर्गाच्या काळातही लाखो हिंदूंचे धर्मांतर : का आणि कसे ?’ या विषयावर चर्चासत्र
पुणे – कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या काळात नि:स्वार्थ भावाने साहाय्य करण्याची आवश्यकता असतांना या काळात ‘हिंदूंचे धर्मांतर करणे, ही एक मोठी संधी आहे’, असे धर्मांतर करणारे मानत आहेत आणि तसा प्रयत्नही ते करत आहेत. कोरोना संकटकाळातही ख्रिस्त्यांनी धर्मांतर करणे, हा मानवतेसाठी सर्वांत मोठा कलंक आहे. येथे कुणीही स्वतःहून धर्मांतरित झाले नाही, कारण येथील संस्कृती आणि धर्म महान आहे. नैसर्गिक आपत्ती, युद्ध, नक्षलवाद चालू राहिल्यास हिंदूंचे धर्मांतर चालूच राहील, हीच इच्छा धर्मांतर करणारे ख्रिस्ती मिशनरी बाळगून आहेत. हिंदूंच्या देवतांविषयी घृणा निर्माण करून आणि ‘ख्रिस्ती पंथ आचरणात आणून येशूचे नाव घेतल्यावर कोरोना तुमचे काही बिघडवू शकत नाही’, असे सांगत ख्रिस्ती मिशनरी धर्मांतर करत आहेत. नागरिकांना आरोग्याची भीती दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात आहे, असे प्रतिपादन इंदूर येथील श्री अखंडानंद आदिवासी गुरुकुल आश्रमाचे महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिंदु राष्ट्राची !’ या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात कोरोना संसर्गाच्या काळातही लाखो हिंदूंचे धर्मांतर : का आणि कसे ?’ या विषयावर नुकतेच चर्चासत्र आयोजित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमामध्ये ‘हिन्दू देवालय परिरक्षण समिती’चे कृष्णा जिल्हा (आंध्रप्रदेश) समन्वयक के. उमाशंकर, मुंबई येथील वैद्यकीय तज्ञ डॉ. अमित थडानी, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. चेतन जनार्दन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सतीश कोचरेकर यांनी केले.
भारताचे आणखीन तुकडे होऊ न देण्यासाठी ‘धर्मांतर बंदी’ कायदा आणायला हवा ! – के. उमाशंकर
हिंदूंच्या मंदिरांतील निधी हिंदूंसाठी, हिंदु धर्मासाठी न वापरता तो सरकारी कामांसाठी वापरला जातो. हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नाही. त्यामुळे धर्मांतर वाढत आहे. दळणवळण बंदीमध्ये मंदिरे बंद झाली आणि पुजार्यांचे अतिशय हाल झाले. चर्चमधील पाद्र्यांना मात्र ‘डिजिटल’ यंत्रणेद्वारे पैसे मिळत राहिले. मंदिरांतील निधी हिंदूंच्या धर्मरक्षणासाठी वापरला जायला हवा. आंध्रप्रदेश आणि तेलंगाणामध्ये पूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले. पूर्व आणि पश्चिम गोदावरी परिसरात ५० चर्च पहायला मिळतील. भारताचे पुढे आणखीन २-३ तुकडे झालेले बघायचे नसतील, तर देशात ‘धर्मांतर बंदी’चा कायदा आणायला हवा. वाय्.एस्. राजशेखर या काँग्रेसच्या नेत्याने २.५ कोटी हिंदूंचे धर्मांतर केले. सध्याच्या स्थितीला विशेषतः आंध्रप्रदेशमध्ये जातीपातीचे राजकारण करून हिंदूंचे मोठ्या संख्येने धर्मांतर होत आहे. आरोग्य अन् आर्थिक या विषयाला धरून ही धर्मांतरे होत आहेत. हिंदु संघटनांनी हिंदु परिचारिका निर्माण करण्यासाठी महाविद्यालये निर्माण करायला हवीत. ख्रिस्ती धर्मप्रचारक ‘एफ्.सी.आर्.ए.’वर (विदेश निधीवर) अवलंबून नाहीत; कारण ते अतिशय धूर्तपणे हिंदूंमधील उच्च वर्गीय समाजाला धर्मांतरित करत आहेत.
वैद्यकीय क्षेत्रात धर्मांतराच्या षड्यंत्राविषयी जागृती व्हायला हवी ! – डॉ. अमित थडानी, वैद्यकीय तज्ञ, मुंबई
हिंदू अतिशय सहिष्णू आहेत. ख्रिस्ती लोकांची विचारसरणी अतिशय विकृत आहे. ही विकृत विचारसरणी डॉक्टर लोकांनी जाणायला हवी. रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर केले जाते. हे अनेकांना माहिती असूनही यावर खुली चर्चा होताना दिसत नाही. जेव्हा यावर खुली चर्चा होईल. तेव्हा जागृती व्हायला वेळ लागणार नाही. हिंदु डॉक्टर संघटित नाहीत. वैद्यकीय क्षेत्रात या धर्मांतराच्या षड्यंत्राविषयी जागृती व्हायला हवी. नुकतेच ‘आय.एम्.ए.’चे (‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे) अध्यक्ष डॉ. जयलाल यांनी धर्मांतराचे खुले समर्थन केले आहे. खरे तर त्यांनी डॉ. जयलाल यांनी पदाचा गैरवापर केल्याविषयी वैद्यकीय संघटनेने विरोध करून त्यांना पदच्युत करायला हवे.
भारतात ‘राष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य’ कायदा लागू करायला हवा ! – चेतन जनार्दन
‘अनफोल्डिंग’ संस्थेने ५० सहस्र गावे दत्तक घेतली असून तेथील १ लाख लोकांचे धर्मांतर झाले आहे. भारतात ‘सेक्युलॅरिझम’च्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन होत आहे. शासनाकडे या संस्थेची अधिकृत नोंदणी होती का ? अशी नोंदणी नसेल, तर ही विदेशी संस्था इकडे येऊन कार्य कसे करू शकते ? कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करून हे धर्मांतर केले जात आहे. हे जाणून घेऊन शासनाने हिंदूंचे धर्मांतर करणार्या संस्थांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी. केवळ हीच संस्था नव्हे, तर अमेरिकेतील ६७ विविध संस्था भारतात धर्मांतराचे कार्य करत आहेत. अशा सर्व संस्थांना रोखण्यासाठी ‘नॅशनल फ्रिडम ऑफ रिलिजन बिल’ (राष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कायदा) लागू करायला हवा.
प्रेक्षकांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिक्रिया
|
या कार्यक्रमाचे फेसबूक आणि यू ट्यूब यांवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. या माध्यमांतून १५ सहस्र ६५५ जणांनी हा कार्यक्रम पाहिला. |