(म्हणे) ‘हिटलर आणि मुसोलिनी यांनी सत्ताप्राप्तीसाठी जी पद्धत अवलंबली, तीच भाजपने भारतात अवलंबली !’
केरळ येथील गिल्बर्ट सेबेस्टीयन या साहाय्यक प्राध्यापकाची हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यावर गरळओक !
- हिटलर आणि मुसलोनी या हुकूमशहांच्या पंक्तीत भाजपला बसवून स्वतःच्या हिंदुद्वेषाचा कंड शमवणार्या ख्रिस्ती प्राध्यापकाचा वैचारिक आतंकवाद ! असे प्राध्यापक विद्यार्थ्यांचे ‘ब्रेनवॉश’ करून त्यांना हिंदूंच्या विरोधात भडकावतात. त्यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण करणार्या अशांवर कारवाई आवश्यक !
- हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर टिकाटीप्पणी करणारे धर्मांध ख्रिस्ती प्राध्यापक चर्चमध्ये नन आणि लहान मुले यांच्यावर पाद्य्रांकडून होणारे बलात्कार, चर्चमध्ये वाढलेला अनाचार यांविषयी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
- साम्यवादी सत्तेवर असलेल्या राज्यात असे धर्मांध ख्रिस्ती प्राध्यापक मोकाट असणार, यात शंका नाही !
कासारगोड – येथील केंद्रीय विद्यापिठातील साहाय्यक प्राध्यापक गिल्बर्ट सेबेस्टीयन यांनी ‘ऑनलाईन’ वर्गाच्या वेळी हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यावर गरळओक केली. ‘ज्या पद्धतीने जर्मनीमध्ये हिटलर आणि इटलीमध्ये मुसोलिनी यांनी आर्थिक उत्कर्षाची आश्वासने देऊन सत्ता प्राप्त केली, तीच पद्धत भाजपने भारतात अवलंबली’, असे वक्तव्य गिल्बर्ट सेबेस्टीयन यांनी ‘समाजवाद आणि नाझीवाद’ हा विषय शिकवतांना केले. (जर्मनीत हिटलर आणि इटलीत मुसोलिनी यांच्या विरोधात बोलणार्यांचे काय झाले, हे सर्वश्रुत आहे. जर भाजप हुकूमशाही पद्धतीने वागला असता, तर सेबेस्टीयन असे बोलण्यास जीवंत तरी राहिले असते का ? – संपादक) गिल्बर्ट सेबेस्टीयन हे शहरातील केंद्रीय विद्यापिठाच्या शिक्षक संघटनेचे सचिव असून केरळ येथील केंद्रीय विद्यापीठातील ‘आंतरराष्ट्रीय नातेसंबंध आणि राजकारण’ या विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या वर्गात त्यांनी हिंदूंचे शुभचिन्ह असलेले स्वस्तिक आणि नाझी वापत असलेले क्रॉसचे चिन्ह यांचीही तुलना केली.
Kerala professor compares Modi with Hitler and right-wing with Nazi Germany in lecture to students, spews venom on Hindus and ‘Hindu parties’https://t.co/9Y9Q3rsoEH
— OpIndia.com (@OpIndia_com) April 22, 2021
(म्हणे) ‘संघ ही भाजपाची अतिरेकी संघटना !’
सेबेस्टीयन यांनी इटलीत मुसोलिनी याच्या राजकीय पक्षाची जशी ‘ब्लॅकशर्ट’ (मुसोलिनीची सशस्त्र संघटना. या संघटनेने विरोध मोडून काढण्यासाठी हिंसक मार्ग अवलंबला.) ही अतिरेकी संघटना कार्यरत होती आणि पुढे जर्मनीमध्ये हिटलरनेही अशा प्रकारे ‘ब्राऊन शर्ट’ संघटना स्थापन केली, त्याच धर्तीवर संघ ही भाजपची अतिरेकी संघटना आहे. (एका राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनेवर गरळओक करणार्या अशा प्राध्यपक हिंदूंचे फसवून धर्मांतर करणार्या ख्रिस्ती संघटनांविषयी कधी बोलतात का ? यातून या धर्मांध ख्रिस्ती प्राध्यापकाचा पराकोटीचा संघद्वेष दिसून येतो. केरळमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांची साम्यवाद्यांकडून हत्या केली जात आहे. या साम्यवादी संघटना, जिहादी संघटना यांच्यावर बोलण्याचे धारिष्ट्य सेबेस्टीयन यांनी दाखवावे ! – संपादक)
महिलांवरील अत्याचार वाढण्यामागे उत्तर भारतातील हिंदू उत्तरदायी असल्याचा अश्लाघ्य आरोप !
महिलांवर अत्याचारात वाढ होण्यास उत्तर भारतातील हिंदू उत्तदायी आहेत. ‘निर्भया’वर (देहलीमध्ये पाशवी अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या युवतीवर) अत्याचार करणारी व्यक्ती नियमित पूजापाठ करणारी होती. (चर्चमध्ये प्रेम आणि शांतीचा पाठ पढवणारे वासनांध पाद्री लैंगिक अत्याचार करतात, त्याविषयी सेबेस्टीयन यांनी बोलावे ! – संपादक) या प्रकारणावरून हिंदूंचा ढोंगीपणा उघड झाल्याचे सेबेस्टीयन म्हणाला. (हिंदूंच्या कथित ढोंगीपणावर बोलणारे धर्मांध ख्रिस्ती त्यांच्या पंथातील ढोंगी वृत्तीच्या लोकांविषयी बोलत नाहीत ! – संपादक)