माजी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम्. श्रीनिवास रेड्डी यांना न्यायालयीन कोठडी !
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण
अमरावती – वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असलेले प्रकल्प संचालक तथा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम्. श्रीनिवास रेड्डी यांची १ मे या दिवशी न्यायालयीन कोठडीत पाठवणी करण्यात आली. वाढीव पोलीस कोठडी मागणीसाठी सरकारी पक्षाचे अधिवक्ता, तसेच अन्वेषण अधिकारी यांच्याकडून न्यायालयापुढे अर्ज करण्यात न आल्यामुळे रेड्डी यांना पुढील १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश धारणी न्यायालयाने दिले. धारणी पोलिसांच्या मार्गदर्शनात रेड्डी यांना विशेष पथकाच्या देखरेखीत येथील मध्यवर्ती कारागृहात स्वाधीन करण्यात आले आहे. रेड्डी यांना स्थानिक अंध विद्यालयात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या खुल्या कारागृहात ठेवण्यात आले आहे.