पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका !

पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला

मुंबई – महाराष्ट्र पोलिसांनी समन्स पाठवून मानसिक त्रास देऊ नये, यासाठी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. वर्ष २०२० मध्ये महाराष्ट्रात गुप्तचर विभागाच्या आयुक्तपदी असतांना रश्मी शुक्ला यांनी पोलिसांच्या स्थानांतरासाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचा अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालकांना पाठवला होता.

यामध्ये त्यांनी काही पोलीस अधिकारी आणि राजकीय नेते यांच्या संभाषणाचे ध्वनीमुद्रणही सादर केले होते. यांतील काही ‘कॉल रेकॉर्ड’ अनधिकृतरित्या करण्यात आल्याचा ठपका ठेवून महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांचे अन्वेषण करण्याचा आदेश दिला आहे. अन्वेषणाला उपस्थित रहाण्यावरून मुंबई पोलिसांनी रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवला आहे. सध्या रश्मी शुक्ला केंद्रामध्ये प्रतिनियुक्तीवर आहेत.