मानवाचा संसाराशी तात्कालिक संबंध
यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महार्णवे ।
समेत्य च व्यपेयातां कालमासाद्य कञ्चन ॥
-रामायण, काण्ड २, सर्ग १०५, श्लोक २६
अर्थ : ज्याप्रमाणे महासागरात वहात जाणारी दोन लाकडे कधी एकमेकांना भेटतात आणि काही काळाने विलग होतात, त्याप्रमाणे दोन माणसे काही काळासाठी एकत्र येतात आणि कालचक्राच्या गतीने विलग होतात.
‘कुठून तरी या संसारात एकत्र आलेले, मिळालेले हे सर्वही जीव काही काळ एकत्र राहून, वेळ आल्याबरोबर स्त्री, पुत्र, धनधान्यादी संपत्ती आणि इष्टमित्र यांना सोडून त्यांच्यापासून वेगळे होतात अन् कुठेतरी दूर निघून जातात. मृत्यूनंतर कुणाचा कुणाशीही फारसा संबंध रहात नाही.’
– प.प. भगवान श्रीधरस्वामी
(संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेेश’, सप्टेंबर १९९८)