करीमगंज (आसाम) येथील मंदिरात दरोडा टाकणार्या १२ धर्मांधांच्या टोळीला अटक !
आसाममधील मंदिरांवर दरोडा टाकणार्या धर्मांधांच्या टोळ्या सक्रीय
धर्मांधांची लुटारू टोळी धनाढ्य इस्लामी संघटनांची कार्यालये किंवा मशिदी यांठिकाणी दरोडा टाकत नाहीत, तर मंदिरांवर दरोडा घालतात. यातून त्यांची धर्मांधता दिसून येते !
करीमगंज (आसाम) – बांगलादेश सीमेजवळील करीमगंज जिल्ह्यातील बलिया येथील ३०० वर्षे जुन्या असलेल्या प्रसिद्ध श्री नृसिंह मंदिरात सशस्त्र धर्मांधंनी दरोडा टाकून सोन्याचे दागिने, रोकड आणि अन्य मौल्यवान वस्तू लुटल्या. या वेळी मंदिराच्या पुजार्याच्या कुटुंबातील सदस्यांना बांधून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी नीलमबाजार पोलिसांच्या पथकाने १२ धर्मांधांना अटक केली. या टोळीने दरोडा घालण्यास वापरलेले वाहन जप्त करून त्याच्या चालकाला अटक केली.
Karimganj, Assam: Narsimha temple robbed, gold ornaments and cash looted, priest and family tied and beaten uphttps://t.co/SvbDGv48pP
— OpIndia.com (@OpIndia_com) April 13, 2021
१. करीमगंज जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, तपासणी पथकाने मंदिरातील पुजार्याच्या चोरीला गेलेल्या भ्रमणभाषवरून धर्मांध दरोडेखोरांचा शोध घेण्यात आला. त्यांच्याकडून चोरीस गेलेले दागिने आणि ३ सहस्र रुपये पोलिसांनी जप्त केले.
२. आसाममधील अनेक जिहादी टोळ्या आसाममधील ब्रह्मपूत्र, बराक खोरे आणि कचार येथे मंदिरांना लुटण्यासाठी सक्रीय आहेत. या टोळ्या गोतस्करीमध्येही सहभागी आहेत. त्यातील बहुतेक बांगलादेशमधील घुसखोर आहेत.