सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्यापासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण
‘COWIN’ पोर्टलवर नाव नोंदणी करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – महाराष्ट्र राज्यात १८ ते ४४ वर्षे या वयोगटातील सर्व नागरिकांसाठी १ मेपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्रारंभ झाला आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने लस उपलब्ध करून देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपरोक्त वयोगटातील नागरिकांना लस देण्यास ४ मेपासून प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यातील ८ तालुक्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेली ग्रामीण रुग्णालये किंवा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी ही लस देण्यात येणार आहे. सध्या चालू असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाच्या व्यतिरिक्त १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यासाठी ‘COWIN’ पोर्टलवर ऑनलाईन नावनोंदणी करावी आणि लसीकरणाचा दिनांक अन् वेळ निश्चित करून घेऊनच लसीकरणाच्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे ४२७ नवीन रुग्ण : १० जणांचा मृत्यू
१. गेल्या २४ घंट्यांतील नवीन रुग्ण ४२७
२. आतापर्यंतचे एकूण रुग्ण १३ सहस्र ४५७
३. बरे झालेले एकूण रुग्ण १० सहस्र २२८
४. उपचार चालू असलेले रुग्ण २ सहस्र ८७६
५. मृत्यू झालेले एकूण रुग्ण ३४७