परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त १०.५.२०१९ या दिवशी महर्षि मयन यांच्या आज्ञेने सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या लघु गणहोमाचे सूक्ष्म परीक्षण !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त महर्षी मयन यांनी सांगितल्याप्रमाणे १०.५.२०१९ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी लघु गणहोम केला. या होमाचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.
१. विविध हविष्यांची (यज्ञात आहुती देतो त्या पदार्थांची) यज्ञात आहुती देणे
समंत्रक आहुती दिल्यामुळे हविष्याच्या आहुती संबंधित देवतांपर्यंत लवकर पोचतात. या होमात श्री गणपति अथर्वशीर्षाची २१ आवर्तने म्हणून पुरोहितांनी तळलेले मोदक, लाह्या, दूर्वा, पिंपळाच्या समिधा आणि गुळान्न या हविष्यांच्या आहुत्या दिल्या. त्यामुळे श्रीगणेशासह त्याची शक्तीही प्रसन्न होऊन त्यांचे तत्त्व यज्ञस्थळी कार्यरत झाले.
१ अ. हविष्य (यज्ञात आहुती देतो तो पदार्थ), कार्यरत देवतातत्त्व आणि त्यांचे प्रमाण
२. श्री गणेशाच्या ‘वर’ या रूपासाठी प्रथम आहुती देण्यात येणे
कोणत्याही यज्ञाच्या आरंभी तो यज्ञ सफल होण्यासाठी श्री गणेशाला ‘वर आहुती’ दिली जाते. या यज्ञातही श्री गणेशाच्या ‘वर’ या रूपासाठी प्रथम आहुती देण्यात आली. तेव्हा श्री गणेशाच्या निर्गुण रूपाने आहुती ग्रहण करून सर्व साधकांना कृपाशीर्वाद दिल्याचे जाणवले. त्यानंतर श्रीगणेशाच्या इतर रूपांनी आहुती स्वीकारल्याचे जाणवले
३. यज्ञस्थळी श्री गणेशाची प्रमुख ३ रूपे कार्यरत होणे
यज्ञीय ज्वाळांमध्ये डाव्या, उजव्या आणि सरळ सोंडेच्या गणपतीच्या आकृत्या दिसल्या. यज्ञस्थळी श्रीगणेशाची प्रमुख ३ रूपे कार्यरत असल्याचे जाणवले.
४. डाव्या सोंडेचा गणपति, उजव्या सोंडेचा गणपति आणि सरळ सोंडेचा गणपति
५. श्री गणेशाच्या कलियुगातील ‘धूम्रवर्ण’ या अवताराची शक्ती कार्यरत होणे
जेव्हा होमातून निर्गुण चैतन्य प्रक्षेपित होत होते, तेव्हा यज्ञस्थळी श्री गणेशाच्या कलियुगातील ‘धूम्रवर्ण’ या अवताराची शक्ती कार्यरत झाल्याचे जाणवले.
६. ‘ॐ’च्या आकृत्यांच्या रूपाने ‘ॐ कार’ स्वरूप श्रीगणेशाचे दर्शन झाल्याचे जाणवणे
जेव्हा श्री गणेशाच्या निर्गुण रूपाचे ‘ॐ कार’ स्वरूप यज्ञस्थळी कार्यरत होत असे, तेव्हा यज्ञीय धूर आणि ज्वाळा यांमध्ये ‘ॐ’च्या आकृत्या सूक्ष्मातून दिसत होत्या. ‘ॐ’च्या आकृत्यांच्या रूपाने ‘ॐ कार’ स्वरूप श्री गणेशाचे दर्शन झाल्याचे जाणवले.
७. यज्ञीय धूर आणि ज्वाळा यांमध्ये पाश अन् अंकुश यांचे दर्शन होणे
जेव्हा श्री गणेशाचे मारक तत्त्व कार्यरत होत असे, तेव्हा यज्ञीय धूर आणि ज्वाळा यांमध्ये पाश अन् अंकुश ही श्री गणेशाची शस्त्रे सूक्ष्मातून दिसत होती.
८. यज्ञीय धूर आणि ज्वाळा यांमध्ये मोदक, दूर्वा अन् जास्वंदीचे फूल यांच्या आकृत्या सूक्ष्मातून दिसणे
जेव्हा श्री गणेशाचे तारक तत्त्व कार्यरत होत असे, तेव्हा यज्ञीय धूर आणि ज्वाळा यांमध्ये मोदक, दूर्वा अन् जास्वंदीचे फूल यांच्या आकृत्या सूक्ष्मातून दिसत होत्या.
९. यज्ञस्थळी गणेशलोकाचे वातावरण सूक्ष्मातून निर्माण झाल्याचे जाणवणे
यज्ञाच्या समाप्तीच्या वेळी वातावरणात निर्गुण गणेशतत्त्व कार्यरत झाल्याचे जाणवले आणि यज्ञस्थळी गणेशलोकाचे वातावरण सूक्ष्मातून निर्माण झाल्याचे जाणवले.
१०. पूर्णाहुतीच्या वेळी श्री गणेशाच्या उजव्या पूर्ण दाताचे, म्हणजे ‘एकदंताचे’ दर्शन होणे
पूर्णाहुतीच्या वेळी श्री गणेशाच्या उजव्या पूर्ण दाताचे, म्हणजे ‘एकदंताचे’ दर्शन झाले. जेव्हा श्री गणेशाचे चैतन्य प्रक्षेपित होत होते, तेव्हा त्याचा दात सोनेरी रंगाचा दिसत होता आणि जेव्हा श्री गणेशाचे निर्गुण तत्त्व प्रक्षेपित होत होते, तेव्हा त्याचा दात पांढर्या रंगाचा दिसत होता. श्रीगणेशाच्या पूर्ण दंताचे दर्शन हे यज्ञाची पूर्णता दर्शवत असल्याचे जाणवले.
११. चांदीच्या गणपतीच्या ३ मूर्तींची वैशिष्ट्ये
पूजनाच्या ठिकाणी चांदीच्या ३ श्री गणेशमूर्तींचे पूजन करण्यात आले होते. या ३ मूर्ती दुसर्या दिवशी झालेल्या जन्मोत्सवाच्या वेळी अनुक्रमे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना देण्यात आल्या. त्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
कृतज्ञता : ‘देवा, तुझ्या कृपेनेच लघु गणहोमाला उपस्थित राहून त्याचे सूक्ष्म परीक्षण करण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळेलेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.६.२०१९)
|