भाजपचे समाधान अवताडे ३ सहस्र ५०३ मतांनी विजयी !
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने येथील विधानसभेची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे घेतलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव करत भाजपचे समाधान अवताडे ३ सहस्र ५०३ मतांनी विजयी झाले. येथे कमळ फुलल्याने भाजपचे नेते आनंदात होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांपैकी कुणीही विशेष प्रतिक्रिया दिली नाही. या पोटनिवडणुकीत अवताडे यांना १ लाख ७ सहस्र ७७४, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांना १ लाख ४ सहस्र २७१ मते मिळाली. भगीरथ भालके यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी, तर समाधान अवताडे यांच्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह इतरांनी सभा घेतल्या होत्या. या निवडणुकीत ६५.७३ टक्के मतदारांनी त्यांचा हक्क बजावला होता.