महाराष्ट्रदिनी राज्यातील २६ जिल्ह्यांत १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरणाला प्रारंभ !
मुंबई – महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राज्यातील २६ जिल्ह्यांतील १३२ लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरणाला प्रारंभ झाला. १ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ११ सहस्र ४९२ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली. उर्वरित जिल्ह्यांत २ मेपासून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. उत्पादकांकडील उपलब्ध साठ्यातून राज्यशासनाने कोरोनाच्या लसीचे ३ लाख डोस खरेदी केले आहेत. लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे शासनाला पूर्ण क्षमतेने लसीकरण करण्याला मर्यादा येत आहेत.