पुणे महानगरपालिकेमध्ये ८ मासांपासून ३२ नादुरुस्त व्हेंटिलेटर धूळ खात पडून !
|
पुणे – गेल्या वर्षी ‘पी.एम्. केअर’ योजनेतून ससून रुग्णालयाला मिळालेल्या ८५ व्हेंटिलेटरपैकी ३२ व्हेंटिलेटर नादुरुस्त होते. गेल्या ८ मासांमध्ये ते दुरुस्त न केल्याने विनावापर पडून होते. एकीकडे व्हेंटिलेटरअभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत असतांना दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणेच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे व्हेंटिलेटर धूळ खात पडून होते. हे वृत्त समोर आल्यानंतर महापालिका यंत्रणेने नादुरुस्त व्हेंटिलेटर तात्काळ दुरुस्त केले.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘नादुरुस्त असलेले २१ व्हेंटिलेटर दुरुस्त केले आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घोषित केल्याप्रमाणे पी.एम्. केअरमधून महापालिकेला पहिल्या टप्प्यात ३० व्हेंटिलेटर मिळाले, तसेच शंकर महाराज मठाच्या वतीने ५ व्हेंटिलेटर मिळाल्याने शहराच्या आरोग्य सेवेसाठी मोठा आधार लाभला आहे.’’