भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी ७ लाखाचे अर्थसाहाय्य !
मुंबई – भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी रुपये ७ लाख रुपयांचे साहाय्य केले आहे. कोरोनाच्या विरोधात लढा देतांना आर्थिक साहाय्य करणार्यांसाठी राज्यशासनाकडून ‘कोविड १९ मुख्यमंत्री साहाय्यता निधी’ स्थापन करण्यात आला आहे.
अभिनेता अजय देवगण यांच्यासह अन्य चित्रपट कलाकारांनी कोरोनाबाधितांसाठी १ कोटी रुपयांचा निधी देऊन केली आयसीयू बेडची व्यवस्था !
प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण यांच्यासह बोनी कपूर, लव रंजन, रजनीश खनुजा, लीना यादव, आशिम बजाजा, समीर नायक, दीपक धर, तरुण राठी, आर्पी यादव आदी चित्रपटक्षेत्रातील कलाकारांनी कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी १ कोटी रुपये इतका निधी उभारला आहे. या निधीतून शिवाजी पार्क येथील ‘भारत स्काऊट्स अॅण्ड गाईड्स’ सभागृहात २० खाटांचे ‘कोविड केअर युनिट’ उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी रुग्णांसाठी व्हेंटिलेटर, पॅरा मॉनिटर, ऑक्सिजन आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.