हात जोडून विनंती करते की, सर्वांनी एकावेळी २ मास्कचा उपयोग करा ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर
मुंबई – आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. मी हात जोडून विनंती करते की, सर्वांनी एकावेळी २ मास्कचा उपयोग करा, असे आवाहन मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना केले आहे. यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा सौ. पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे.
या वेळी अधिक माहिती देतांना सौ. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘‘लसीकरण केंद्रावर ज्यांनी नाव नोंदणी केली आहे, त्यांच्या भ्रमणभाषवर संदेश येईल. संदेश दाखवल्यावरच लसीकरण केले जाईल.’’