कोरोनातून बरे झाल्यानंतरही ६ मासांपर्यंत मृत्यूचा धोका रहातो ! – संशोधनाचा निष्कर्ष

नवी देहली – कोरोनाबाधित घरीच अलगीकरणात राहून बरे होत असले, तरी त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे अधिक काळासाठी रहातात, तसेच काही लोकांना बरे झाल्यावरही मृत्यूचा धोका रहातो, असा दावा ब्रिटीश नियतकालिक ‘नेचर’मध्ये प्रकाशित एका संशोधनातून करण्यात आला आहे. या संशोधनासाठी वैज्ञानिकांनी डेटाबेसमधून ८७ सहस्रांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आणि ५० लाख सामान्य रुग्ण यांची तपासणी केली. यात कोरोनाचा संसर्ग न झालेल्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये ६ मासांपर्यंत मृत्यूचा धोका ५९ टक्के अधिक होता.