संभाजीनगर येथे नशेतील महापालिका अधिकारी आणि शिपाई यांनी रस्त्यावर गोंधळ घातला !

दोघांवर गुन्हा नोंद !

महापालिकेतील अधिकारी आणि शिपाई यांचे वागणे लज्जास्पद ! अशा अधिकार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.

संभाजीनगर – येथील महापालिकेतील अधिकारी आणि शिपाई यांनी नशेमध्ये २९ एप्रिल या दिवशी सायंकाळी बाबा पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर गोंधळ घातला. सिग्नलवर पोलिसांनी त्यांचे महापालिकेचे चारचाकी वाहन थांबवण्यास सांगितल्यानंतर वाहनातून उतरून अधिकारी आणि शिपाई रस्त्यावर आडवे झाले. पोलिसांनी त्यांना उचलून बाजूला नेण्याचा प्रयत्न केल्यावर दोघांनी पोलिसांशी झटापट केली. यात वाहतूक शाखेचे पोलीस किरकोळ घायाळ झाले. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गोंधळ घालणार्‍या या दोघांना क्रांती चौक पोलीस ठाण्यात नेले. रात्री दोघांची वैद्यकीय पडताळणी करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. महापालिकेच्या चारचाकी वाहनावर अत्यावश्यक सेवा लिहिलेला महापालिकेचा लोगोही होता. महापालिकेचे हे अधिकारी शाखा अभियंता असल्याची माहितीही संबंधितांनी दिली. (कोरोनाचे महाभयंकर संकट असतांना महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मद्यप्राशन करून गाडी चालवतात हे गंभीर आहे. – संपादक)