कल्याण येथे धर्मांधाकडून ४ लाखांहून अधिक किमतीचा गांजा हस्तगत !
ठाणे, ३० एप्रिल (वार्ता.) – महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी सापळा रचून रहमत युसूफ पठाण या धर्मांधाला अटक केली आहे. त्याच्याकडून २७ किलोहून अधिक वजनाचा गांजा हा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. त्याची किंमत ४ लाख ५ सहस्र रुपये इतकी आहे. त्याला ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (अमली पदार्थांची तस्करी आणि ती करणार्या टोळ्या यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त का केला जात नाही ? – संपादक)