बैठकीत विनामास्क सहभागी झालेल्या थायलंडच्या पंतप्रधानांकडून दंड वसूल !
बँकॉक (थायलंड) – थायलंडचे पंतप्रधान जनरल प्रयुत चान ओ चा यांनी मास्क न घातल्यामुळे त्यांच्याकडून १४ सहस्र २७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ते एका बैठकीत मास्क न लावताच सहभागी झाले होते. बँकॉकमध्ये मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. बँकॉकचे राज्यपाल असविन क्वानमुआंग यांनी पंतप्रधानांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.