पुणे विद्यापिठाच्या ‘ऑनलाईन’ परीक्षेतील गोंधळ
पुणे विद्यापिठाकडे १३ सहस्र तक्रारी !
|
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या वतीने प्रथम सत्राच्या ‘ऑनलाईन’ परीक्षेकरिता ‘लॉग इन’ होत नसल्याच्या अनुमाने ९ सहस्र तक्रारी परिक्षार्थींनी दाखल केल्या आहेत. ‘लॉग इन’ होत नसल्याने पेपर लिहिता येत नाही. परिणामी विद्यार्थी परीक्षेस अनुपस्थित असल्याची नोंद होत आहे. विद्यापिठाने वस्तूस्थिती पडताळून यावर योग्य पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.
१६ एप्रिलपासून प्रतिदिन १०० पेक्षा अधिक विषयांची आणि सव्वा लाख ते दीड लाख विद्यार्थी परीक्षा देत असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात सोडवलेल्या प्रश्नापैकी अल्प प्रश्न ‘सबमीट’ झाले, ‘उत्तर सेव्ह झाले नाही’, अल्प गुण पडले या प्रकारच्या ४ सहस्र तक्रारी, तर ९ सहस्र तक्रारी या ‘लॉग इन’ न झाल्याच्या आहेत. या सर्व तक्रारी १६ ते २० एप्रिल या कालावधीतील आहेत.