वास्को येथील वर्ष २०१७ मधील दुहेरी खून प्रकरणी आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रहित
चक्रावणारा न्याय !
पणजी, २९ एप्रिल (वार्ता.) – वास्को येथील दुहेरी खून प्रकरणातील आरोपी प्रतिमा नाईक यांना जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा २९ एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने रहित करून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. गोवा खंडपिठाने आरोपी प्रतिमा नाईक यांची त्वरित सुटका करावी, असे आदेशात पुढे म्हटले आहे.
वर्ष २०१७ मध्ये आरोपी प्रतिमा नाईक यांनी त्यांची सासू उषा नाईक आणि भावजय नेहा नाईक यांचा खून करून घरातून दागिने पळवल्याचा आरोप होता. या प्रकरणी वास्को पोलिसांनी अन्वेषण करून आरोपी प्रतिमा नाईक यांना कह्यात घेतले होते. या खून प्रकरणात सहभागी असलेला आरोपीचा भावोजी अभिजीत कोरगावकर याला पोलिसांनी माफीचा साक्षीदार ठरवून खुनाचा छडा लावला होता. आरोपी प्रतिमा नाईक यांच्या विरोधात सर्व पुरावे गोळा केले होते. जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी प्रतिमा नाईक यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. या निर्णयाला आरोपी प्रतिमा नाईक यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.