सोलापूर, कलबुर्गी (कर्नाटक), नगर येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट आता ५० रुपये !
सोलापूर – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेल्वे स्थानकातील गर्दी न्यून होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म (फलाट) तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर, कलबुर्गी (कर्नाटक) आणि नगर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ही दरवाढ २७ एप्रिलपासून चालू करण्यात आली असून २५ मे २०२१ पर्यंत असणार आहे.