आर्मेनियन लोकांच्या वंशविच्छेदाला अमेरिकेची मान्यता !

जो बायडेन

वॉशिंग्टन – पहिल्या महायुद्धाच्या वेळी म्हणजे वर्ष १९१५ मध्ये ओटोमन साम्राज्याच्या सैनिकांनी आर्मेनियन लोकांच्या केलेल्या वंशविच्छेदाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मान्यता दिली आहे. वर्ष १९१५ मध्ये सुमारे १५ लाख आर्मेनियन लोकांना ओटोमन साम्राज्याच्या सैनिकांनी अमानवी पद्धतीने ठार मारले होते.

या वंशविच्छेदाला मान्यता देणारे जो बायडेन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. याआधी अमेरिकेच्या कुठल्याही राष्ट्राध्यक्षांनी या वंशविच्छेदाला मान्यता दिली नव्हती. याला तुर्कस्तानने विरोध केला आहे. ‘असे बोलून इतिहासाचे पुनर्लेखन केले जाऊ शकत नाही. आमचा इतिहास काय आहे, हे आम्हाला कुणी शिकवण्याची आवश्यकता नाही’, असे तुर्कस्तानने म्हटले आहे.