फरीदाबाद (हरियाणा) येथे रामनवमी आणि हनुमान जयंती यानिमित्त आयोजित ‘ऑनलाईन’ प्रवचनांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद
फरीदाबाद (हरियाणा) – रामनवमीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने येथे नुकतेच ‘ऑनलाईन’ प्रवचन आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. संदीप मुंजाल यांनी श्रीरामनवमीचे महत्त्व, प्रभु श्रीरामाची वैशिष्ट्ये, श्रीरामाचे गुण, श्रीरामाचा जप कसा करावा यांविषयी विस्तृत माहिती दिली. या सत्संगाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. ‘सत्संगामध्ये नामजप केल्याने पुष्कळ चांगले वाटले’, असे जिज्ञासूंनी सांगितले.
हनुमान जयंतीनिमित्त ‘ऑनलाईन’ प्रवचन
हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने येथे २६ एप्रिल या दिवशी एक ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्यात आले. या वेळी कोरोना महामारीमुळे मंदिरात जाण्यास अडचण असल्यामुळे आपण घरी राहून हनुमानाचे पूजन कसे करू शकतो ? त्याची उपासना कशी करावी ? इत्यादी माहिती देण्यात आली. या प्रवचनाचाही अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.