कणकवली येथे ट्रकमधून ३२ लाख रुपयांचे अवैध मद्य पोलिसांच्या कह्यात
कणकवली – शहरातील गड नदीजवळ असलेल्या कळसुली फाट्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग, सिंधुदुर्गच्या पथकाने कारवाई करत अवैध मद्याची वाहतूक करणारा ट्रक कह्यात घेतला. या ट्रकमध्ये पथकाला अंदाजे ३२ लाख ४० सहस्र रुपयांचे अवैध मद्य सापडले. या प्रकरणी पोलिसांनी मद्य वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक आणि ट्रकचालक यांना कह्यात घेतले आहे.