सावंतवाडी नगरपरिषदेच्या २ कर्मचार्यांचा मृत्यू
सावंतवाडी – येथील नगरपरिषदेच्या दोन कर्मचार्यांचा २७ एप्रिलला कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील एक कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत होता, तर दुसरा कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत होता. कोरोना महामारीच्या काळात सेवा बजावतांना मृत्यू झालेल्या या २ कर्मचार्यांपैकी कायमस्वरूपी कार्यरत असलेले कर्मचारी संजय वारंग यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्त्वाखाली नियुक्तीचा लाभ देण्यात येईल, तसेच कंत्राटी कर्मचारी कमलेश परब यांच्या पत्नीस नगरपरिषदेच्या सेवेत कंत्राटी पद्धतीवर नेमणूक देण्याचा निर्णय सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने घेण्यात आला. दिवंगत २ कर्मचार्यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी ही माहिती दिली.
सिंधुदुर्गात गेल्या २४ घंट्यांत १५ जणांचा मृत्यू
१. गेल्या २४ घंट्यांतील नवीन रुग्ण १४६
२. उपचार चालू असलेले रुग्ण २ सहस्र ३८२
३. बरे झालेले एकूण रुग्ण ९ सहस्र ३३२
४. आतापर्यंतचे एकूण रुग्ण १२ सहस्र २७
५. गेल्या २४ घंट्यांत १५ जणांचा मृत्यू
६. मृत्यू झालेले एकूण रुग्ण ३०७