गुरुग्राम येथे अपुर्या रुग्णवाहिकांमुळे रिक्शा, चारचाकी आदी गाड्यांमधून न्यावे लागत आहेत मृतदेह !
गुरुग्राम (हरियाणा) – येथे कोरोनामुळे होणार्या मृतांना स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी आता रुग्णवाहिकाही मिळेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांना आप्तजनांचे मृतदेह रिक्शा, चारचाकी गाडी, अशा मिळेल त्या वाहनाने स्मशानभूमीपर्यंत नेण्याची वेळ ओढवली आहे. इतके करूनही स्मशानभूमीबाहेर अंत्यसंस्कारांसाठी मृतदेह घंटोन्घंटे ताटकळत राहिले.
Families are forced to carry #Covid19 victims in auto-rickshaws and private vehicles for cremation in the absence of ambulances in #Gurugram | #coronavirus | @TanushreePande https://t.co/pl3jTuNdXJ
— IndiaToday (@IndiaToday) April 27, 2021
सगळ्या परिस्थितीत रुग्णवाहिका मिळालीच, तरी अनेक रुग्णवाहिका चालक अव्वाच्या सव्वा दर आकारू लागले आहेत. किमान ५ सहस्र ते १५ सहस्र रुपयांपर्यंत मागणी चालकांकडून केली जात आहे. यासाठी प्रशासनाने दिलेले हेल्पलाईन क्रमांकही काम करत नाही.