कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पारशी मृतदेहांवर अग्नीसंस्कार करणार
सहस्रो वर्षांची परंपरा पालटण्याचा निर्णय !
नवी देहली – कोरोनामुळे वाढत्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर पारशी पंथीयांनी आता मृतदेहांवर अग्नीसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. मृतदेहांच्या माध्यमांतून कोरोनाचा संसर्ग होऊ नये; म्हणून पारसी पंचायतच्या पदाधिकार्यांनी हा निर्णय घेतला आहे. पारशी लोकांमध्ये मृतदेह गिधाडांसाठी उघड्यावर सोडले जातात. मुंबईत एका विहिरीमध्ये मृतदेह टाकण्याची परंपरा आहे. पारशी पंथीय अग्नीला पवित्र मानतात. देशात पारशी लोकांची संख्या सुमारे १ लाख आहे. सूरतमध्ये गेल्या एक मासामध्ये ४० पारशी लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.