यवतमाळ येथे अतिरिक्त शुल्क आकारल्याप्रकरणी ६ कोविड रुग्णालयांना प्रशासनाची नोटीस !

यवतमाळ, २८ एप्रिल (वार्ता.) – जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालये ही रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क घेत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या रुग्णालयात निरीक्षक नियुक्त केले आहेत. त्यांनी अतिरिक्त शुल्काच्या तपासण्या करून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला. त्यानुसार शहरातील ६ खासगी कोविड रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाकडून नोटीस पाठवण्यात आल्या असून यासंदर्भात ४८ घंट्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये २४ खासगी रुग्णालयांना ‘डेडीकेटेड कोविड केअर सेंटर’ म्हणून मान्यता देण्यात आली.