कराड येथे धुरांडी कोसळून घरांची लाखो रुपयांची हानी
कराड – येथील बारा डबरी परिसरातील कचरा डेपोजवळ असलेल्या बायोडेट असोसिएशनच्या जैविक वैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्पाची अनुमाने ३०० फूट उंचीची धुरांडी २६ एप्रिलच्या रात्री ९ वाजता झालेल्या वादळी वार्यात कोसळली. ही धुरांडी ५ घरांवर कोसळल्याने मोठा आवाज होऊन यामध्ये घरांची अनुमाने ३ लाख ५० सहस्र रुपयांची हानी झाली आहे. प्रकल्पाची धुरांडी वीज वाहक तारांवर प्रथम कोसळल्याने रात्रीच्या वेळी वीजपुरवठाही खंडीडित झाला होता.