सोलापूर जिल्ह्यात २० मेट्रिक टन ऑक्सिजन दाखल !

सोलापूर – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा भासू देणार नाही. जिल्ह्यात प्रतिदिन ३१ मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. त्यातील २० मेट्रिक टन ऑक्सिजन सोलापूर येथे आला असून उर्वरित १२ मेट्रिक टन जिल्ह्यातील २ प्लँटमधून हवेतून निर्मिती करत आहोत. त्यामुळे आता रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील ऑक्सिजनविषयी उपाययोजनांसंदर्भात बोलतांना सांगितले.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी ९०० रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत. या इंजेक्शनचा उपयोग कोविड रुग्णालय आणि ‘कोविड केअर सेंटर’मधील रुग्णांसाठी करायचा आहे. या इंजेक्शनचे वितरण निश्‍चित केल्याप्रमाणे करायचे असून यात कोणतीही गडबड खपवून घेतली जाणार नाही, असे शंभरकर यांनी या वेळी सांगितले.