परात्पर गुरु डॉक्टरांचा ‘न भूतो न भविष्यति ।’ असा अमृत महोत्सव सोहळा पहातांना साधिकेने अनुभवलेली आनंदावस्था !

परात्पर गुरु डॉ. आठवले

प.पू. गुरुदेव,
आपल्या दिव्य चरणी कृतज्ञतापूर्वक प्रणाम आणि वंदन !

१. परात्पर गुरु डॉक्टरांचा ‘न भूतो न भविष्यति ।’ असा अमृत महोत्सव सोहळा !

परात्पर गुरु डॉक्टरांचा हा अपूर्व सोहळा ‘न भूतो न भविष्यति ।’ असा होता. क्षणभरही न थांबणारा आणि निरंतर गतीमान असणारा काळही त्याचे कार्य थांबवून हा अद्भूत सोहळा पहात थांबला ! ती वेळ आणि तो प्रहर हे ‘अमृत महोत्सवा’चे शुभ क्षण होते.

२. सोहळा पहातांना अनुभवलेला आनंद शब्दातीत असणे आणि काळगर्भाच्या महाशून्यात अनंत कोटी ब्रह्मांडे एकरुप होतांना दिसणे

सौ. विदुला हळदीपूरकर

गुरुदेवा, सोहळा पहातांना ‘तुम्हीच परब्रह्म आहात’, याची मला प्रचीती आली. त्या वेळी मिळालेला आनंद, ती शांती आणि मनाची स्थिती शब्दांत व्यक्त न करता येणारी आहे. अनंत कोटी ब्रह्मांंडे, त्या ब्रह्मांडातील प्रत्येक जीव त्या प्रहरात तरंग बनून तरंगत होता. गुरुदेवा, माझ्या अंतरात आनंदाचे तरंग नाचत आणि बागडत होते. आम्ही डोळ्यांनी पहात होतो, ते वेगळेच होते आणि प्रत्यक्षात (सूक्ष्मातून) घडत होते, ते निराळेच होते. दुसरीकडे काळगर्भाच्या त्या महाशून्यात मला अनंत कोटी ब्रह्मांडे ‘स्वाहा’ होतांना दिसत होती. हा प्रलयंकारी आणि रौद्र; पण रम्य अनुभव होता.

गुरुदेवा, सर्वकाही तुम्हीच आहात. तो काळ ‘त्याच्या अंशात्मक असलेली अनंत कोटी ब्रह्मांडे, परब्रह्म, देवता, ऋषिमुनी, मनुष्य, अन्य जीव आदी सर्व ‘एका’तून ‘अनेकात’ करून पुन्हा ‘एकात’ रूपांतरित होत आहे’, असे मला दिसत होते. सर्व कल्पनातीत आणि विचारांच्या पलीकडील अन् अवर्णनीय आहे.

‘हे गुरुदेवा, या अपात्र जिवाला तुमच्या चरणी स्थान द्यावे’, हीच आर्त प्रार्थना !

– सौ. विदुला हळदीपूरकर, हुब्बळ्ळी, कर्नाटक.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक