कांदिवली (मुंबई) येथे श्रीरामनवमी ते हनुमान जयंती सप्ताहानिमित्त महिलांसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान
मुंबई – कांदिवली येथील धर्मप्रेमी महिलांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रामनवमीनिमित्त म्हणजेच २१ एप्रिल या दिवशी दुपारी ३ ते ४ या वेळेत शौर्यजागृती व्याख्यान पार पडले. कांदिवली येथील धर्मप्रेमी सौ. आशा शेडगे यांनी त्यांच्या परिचयातील महिलांमध्ये याविषयी जागृती करून त्यांना या व्याख्यानाला जोडले. या वेळी व्याख्यान ऐकतांना महिलांनी ‘आपणही स्वरक्षणासाठी सिद्ध व्हायला हवे’, असे वाटत असल्याचे सांगितले आणि याविषयी ७ दिवसांचा एक नियमित वर्ग घेण्याची विनंती केली.
या वेळी समितीचे मुंबईतील प्रशिक्षणसेवक श्री. हेमंत पुजारे यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आपल्यातील शौर्य जागृत ठेवावे लागते, अन्यथा त्यांच्यावरील आघात वाढतात. याची कितीतरी उदाहरणे आपण प्रतिदिन ऐकतो. हे आघात रोखण्यासाठी आपल्याला शौर्यजागृती करायला हवी’, असे मार्गदर्शन श्री. हेमंत पुजारे यांनी केले.
अभिप्राय : समाजात शिकवल्या जाणार्या प्रशिक्षणवर्गामध्ये मानसिकता घडत नाही. केवळ प्रकार शिकवले जातात; पण प्रत्यक्ष प्रसंग आला, तर कसे लढायचे, हेच महत्त्वाचे आहे. ते इथे शिकायला मिळेल, हे ऐकून बरे वाटले. – एक महिला जिज्ञासू