मशिदींवरील अवैध भोंग्यांचा प्रश्‍न केवळ ध्वनीप्रदूषणापुरता नसून हिंदूंना हुसकावून लावणारा ‘लॅण्ड जिहाद’ ! – संतोष पाचलग, हिंदुत्वनिष्ठ

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘ध्वनीक्षेपकांवरून अजान : संवैधानिक कि असंवैधानिक ?’ या विषयावर ऑनलाईन परिसंवाद

मुंबई – येथील कपाडियानगर (कुर्ला) येथे ५० टक्के हिंदू रहात होते. तेथे अनेक मशिदींवर अनधिकृत भोंगे लावून कर्णकर्कश आवाजात अजान देण्यास प्रारंभ झाला. सततच्या त्रासाला कंटाळून तेथील हिंदू मुसलमानांना घरे विकून निघून गेले. आज तेथे केवळ ३ टक्के हिंदू उरले आहेत. त्यामुळे मशिदींवर लावण्यात येणारे अनधिकृत भोंगे हा प्रश्‍न केवळ ध्वनीप्रदूषणापुरता मर्यादित नसून हिंदूंना हुसकावून लावणारा नियोजित जिहाद आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. ध्वनीक्षेपकावरून दिली जाणारी अजान हा एक प्रकारे ‘लॅण्ड जिहाद’ आहे, असे परखड मत नवी मुंबईतील मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात याचिका करणारे हिंदुत्वनिष्ठ श्री. संतोष पाचलग यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘ध्वनीक्षेपकांवरून अजान : संवैधानिक कि असंवैधानिक ?’ या ऑनलाईन परिसंवादात बोलत होते.

या परिसंवादामध्ये अखंड भारत मोर्चाचे अध्यक्ष श्री. संदीप आहुजा, हरियाणा येथील विवेकानंद कार्य समितीचे अध्यक्ष श्री. नीरज अत्री आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आदी मान्यवर सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश कोचरेकर यांनी केले. हा कार्यक्रम ‘फेसबूक’ आणि ‘यू-ट्यूब’ यांच्या माध्यमातून १३ सहस्र ९५१ लोकांनी पाहिला.

भोंग्यावरून अजान देणे, हे पूर्णत: घटनाविरोधी ! – संतोष पाचलग

संतोष पाचलग

आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मिळवल्यानंतर नवी मुंबईत ४९ पैकी ४५ मशिदींमध्ये अवैधपणे भोंगे लावले गेल्याचे आढळले. सध्या महाराष्ट्रात ३ सहस्र २०० मशिदींवर अवैध भोंगे आहेत, असे माहितीच्या अधिकारात कळले आहे. ध्वनीक्षेपकाची अनुमती असली आणि जर कुणी त्याच्या आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार केली, तर ते त्वरित काढून अनुमती रहित करण्याची तरतूद आहे. याविषयी पोलिसांसह कुणालाही ठाऊक नाही.

आम्ही नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटलो. तेव्हा त्यांनी ‘भारतात सर्वत्र अवैध भोंगे लावले आहेत. मलाच का विचारत आहात ? तुम्ही मुंबई, लखनौ येथे जाऊन विचारा’, असे दायित्वशून्यपणाचे उत्तर दिले. अवैध भोग्यांसंदर्भात २-३ वेळा पाठपुरावा करूनही पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. न्यायालयाने ‘भोंग्यावरून अजान देणे हे पूर्णत: घटनाविरोधी आहे’, असे सांगून ते हटवण्याचा निर्णय दिला. भोंगे लावण्यास अनुमती घेतली असली, तरी ते हटवण्याची तरतूद न्यायालयाच्या निर्णयात आहे.

हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणारे अजान हे इस्लामचे जिहादी रूप ! – संदीप आहुजा

संदीप आहुजा

इस्लामने संपूर्ण जगाला ‘दारुल-हब’ आणि ‘दारुल-इस्लाम’ या दोन भागांत वाटले आहे. त्यांना सर्वांना ‘दारुल-इस्लाम’ करायचे आहे. त्यासाठी त्यांनी जिहादचा मार्ग निवडला आहे. हिंदु वस्तीत २ ते ३ घरे घेऊन ते तिथे मशीद उभारतात. दिवसातून २ वेळा हिंदूंची आरती करण्याच्या वेळांत ते ध्वनीक्षेपकावरून ५ वेळा अजान देऊ लागतात. अशा प्रकारे ते हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडतात. मशिदींवरील अनधिकृत भोंगे हे जिहाद पुकारण्यासाठी हत्यार म्हणून वापरले जात आहे. पोलीस मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधातील तक्रारींची नोंद घेत नाहीत. आम्ही देहलीतील १० मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात राष्ट्रीय हरित प्राधिकरणात गेलो. तेथे एक मुसलमान न्यायाधीश असल्यामुळे त्याने याचिका मागे घेण्यास प्रथम दबाव आणला होता; मात्र आम्ही कायदेशीर भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे त्यांना याचिका स्वीकारावी लागली; मात्र त्यांनी अपेक्षित निर्णय न दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जावे लागले.

अजानमधील शब्दांचा अर्थ अन्य धर्मियांच्या भावना दुखावणारा ! – नीरज अत्री

नीरज अत्री

इस्लामच्या पहिल्या १५ वर्षांत अजान अस्तित्वात नव्हती. इस्लामची स्थापना होतांना महंमद पैगंबर यांनी स्वत:ची विशेषता निर्माण करण्यासाठी घंटी वाजवून बोलावणे यांसह अन्य प्रकारे अजान देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एकाला स्वप्न पडले की, उंच ठिकाणी जाऊन ओरडून अजान देता येईल. असा अजान देण्याचा इतिहास आहे. आपण अजान ऐकतो; पण त्याचा अर्थ बहुतांश लोकांना ठाऊक नाही. अजानमध्ये म्हटले आहे, ‘अल्ला हाच सर्वश्रेष्ठ आहे. या जगात अल्लाखेरीज पुजले जाण्यास दुसरे कुणीही योग्य नाही, तशी मी ग्वाही देतो.’ प्रतिदिन देशभरात ५ वेळा भोंग्यांवरून हा संदेश सर्वांना ऐकवला जातो. हा एक प्रकारे हिंदूंच्या देवतांचा अवमान असून मुसलमानेतरांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार आहे. त्यामुळे या अजानच्या विरुद्ध कलम २९५ (अ) अंतर्गत तक्रार करता येऊ शकते. अजान देणे, हे केवळ ध्वनीप्रदूषण करणारे नाही, तर नैतिकदृष्ट्याही अयोग्य आहे. त्यावर कारवाई झाली पाहिजे.

अवैध भोंग्यांच्या विरोधात कायदे आहेत; मात्र त्यांच्या कार्यवाहीची आवश्यकता आहे. ‘या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे’, असे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग म्हणाले होते. यावरून इस्लामच्या विचारसरणीला या देशात जोपासले जाते, हे लक्षात येते. त्यामुळे केवळ कायदे नाहीत, तर त्याच्या कार्यवाहीची आवश्यकता आहे.

कायदा-सुव्यवस्था, समाज आणि नैतिकता यांना बाधा आणणार्‍या धार्मिक अधिकारांवर निर्बंधच हवेत ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

१. राज्यघटनेतील कलम २५ नुसार प्रत्येकाला धार्मिक अधिकार प्रदान केलेला आहे; पण कायदा-सुव्यवस्था आणि समाज यांना बाधा येऊ नये, लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, तसेच अनैतिकता नसावी, या ३ आधारांवरच धार्मिक स्वातंत्र्य दिले जाते. जर समाजाला बाधा येत असेल, तर धार्मिक अधिकारांवर निर्बंध आणायला हवेत.

२. सर्वोच्च न्यायालयाने ‘तुम्ही धार्मिक अधिकाराच्या नावाखाली ध्वनीप्रदूषण करू शकत नाही’, असे म्हटले आहे. अजान देणे आणि ध्वनीक्षेपकावर अजान देणे या २ वेगळ्या गोष्टी आहेत. अजान देणे हा धार्मिक अधिकार असला, तरी ती देण्यासाठी तुम्ही ध्वनीक्षेपकाचा उपयोग करू शकत नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयानेही याच गोष्टीचा स्पष्ट शब्दांत पुनरुच्चार केला.

३. कुणीही मनात आले म्हणून सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपक लावू शकत नाही. महाराष्ट्रात ध्वनीक्षेपक लावण्यासाठी पोलिसांना अर्ज द्यावा लागतो, तसेच ठराविक रक्कमही शासनाला द्यावी लागते. जर (मशिदींमधून) ती दिली जात नसेल, तर ध्वनीप्रदूषण करण्यासमवेतच शासनाची लूटही केली जात आहे, असेच म्हणावे लागेल.

४. अनधिकृत भोंग्यांच्या विरोधातील लढाईत सर्व ठिकाणच्या हिंदूंनी एकत्र आले पाहिजे. पोलीस तक्रारीमध्ये १०० क्रमांकांसह ‘ट्विटर’ आणि ‘फेसबूक’ या सोशल मीडियाच्या माध्यमांतून, तसेच राष्ट्रीय हरित प्राधिकरण, जिल्हाधिकारी आदींकडे समूहाने तक्रारी केल्या पाहिजेत. पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत ध्वनीप्रदूषण करणार्‍याला ५ वर्षे शिक्षा आणि १ लाख रुपयांचा दंड आहे. आपण या कायद्यांचा वापर केला पाहिजे.

अवैध भोग्यांच्या विरोधात कृतीची दिशा देणारे मान्यवरांचे उद्बोधक विचार

संतोष पाचलग – आपण भोंग्यांच्या विरोधात आपला सहभाग वाढवत नाही, तोपर्यंत कोणताही शासनकर्ता त्याला न्याय देऊ शकत नाही. शासनकर्ता समाजाच्या पाठीमागे धावत असतो. समाज एकत्रित होऊन जी मागणी करेल, त्याला शासनकर्त्यांचे समर्थन मिळते. त्यामुळे प्रत्येक स्तरावर जनजागृती अपेक्षित आहे, तरच शासनकर्ते न्याय देऊ शकतील.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर – अवैध भोंग्यांच्या विरोधात तक्रार करतांना एकट्या व्यक्तीला पोलीस जुमानत नाहीत; परंतु आपण संघटितपणे प्रयत्न केल्यास त्यांना त्याची नोंद घेणे भाग पडते. आपण तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर जर पोलीस आपल्याला योग्य प्रतिसाद देत नसतील, तर त्यांची वरिष्ठांकडे तक्रार करू शकतो. यासह माहितीच्या अधिकाराचा उपयोग, हेही एक प्रभावी माध्यम आहे. देशात केवळ अवैध भोंग्यांची समस्या नाही, तर हिंदूंना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हेच या समस्यांवरील उत्तर आहे.