दिवसभत ३८ रुग्णांच्या मृत्यूसह एप्रिल मासात कोरोनाचे एकूण २२४ बळी
पणजी – गोव्यात २६ एप्रिल या दिवशी कोरोनाबाधित ३८ रुग्णांचा मृत्यू झाला. यामधील ९ रुग्णांचा दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात, २३ रुग्णांचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात, २ रुग्णांचा दक्षिण गोव्यातील आणि एका रुग्णाचा उत्तर गोव्यातील खासगी रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला. मडगाव येथील हॉस्पिसियो येथे २ रुग्णांना, तर म्हापसा येथील आझिलो रुग्णालयात एका रुग्णाला मृतावस्थेत आणण्यात आले. मृतांमध्ये ३१ ते ९० वर्षे वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे, तसेच मृतांमध्ये ४ रुग्णांचे वय ४० वर्षांहून अल्प होते. राज्यात १ ते २६ एप्रिल या कालावधीत कोरोनामुळे एकूण २२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर कोरोना महामारीतील एकूण मृतांची आतापर्यंतची संख्या १ सहस्र ५५ झाली आहे.