भारतीय जनता पक्षाचे सांस्कृतिक आघाडीप्रमुख ओंकार शुक्ल यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तू आणि रुग्णालयात फळे वाटप
मिरज – भारतीय जनता पक्षाचे सांस्कृतिक आघाडीप्रमुख श्री. ओंकार शुक्ल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिरज शहरातील गरजूंना जीवनावश्यक वस्तू आणि परमशेट्टी मल्टिपर्पज रुग्णालयात फळे वाटप करण्यात आले. या वेळी श्री. ओंकार शुक्ल, डॉ. विनोद परमशेट्टी, विनायक इंगळे, प्रसाद शानबाग, मनोज यादव, अनिल तिवारी, संतोष कुलकर्णी, राजन काकीर्डे, श्रीपाद भट, ऋषिकेश गाडगीळ, महेश पोंक्षे, गजेंद्र चिकोर्डे उपस्थित होते.
श्री. ओंकार शुक्ल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या, तसेच विविध लोकप्रतिनिधी यांनीही आवर्जून शुभेच्छा दिल्या.