आम्ही आगाऊ पैसे देतो, तुम्ही इंजेक्शन आणि ऑक्सिजन घ्या ! – चंद्रकांत पाटील, भाजप, प्रदेशाध्यक्ष
पुणे – महापालिकेला वितरकांकडून किंवा आस्थापनांकडून इंजेक्शन मिळत नाहीत. यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वीच्या चर्चेचा संदर्भ पत्रकारांना दिला. औषध वितरकांचा पूर्वीचा अनुभव पहाता आगाऊ पैसे घेऊन इंजेक्शन देतात. राज्यात कुठेही इंजेक्शनसाठी वितरकांना पैसे आगाऊ हवे असतील, तर त्यांनी माझ्याकडून घ्यावेत. जिल्हा परिषदेकडून पैसे मिळाले की, माझे पैसे परत करावेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले. ते महापालिकेने इंजेक्शन घ्यायचे ठरवले होते या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना बोलत होते.
देशामध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडली आहे. प्राणवायूचा अपुरा पुरवठा, बेड न मिळणे, रेमडेसिवीरचा तुटवडा अशा स्वरूपातील अत्यावश्यक सेवा कोलमडल्या आहेत. या सेवांच्या नियंत्रणाचे आणि पुरवठ्यासंदर्भातील हक्क मर्यादित असल्याने त्या पुरवण्याची तयारी असली तरी नियमांमुळे नागरिकांना पुरवता येत नाहीत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर श्री. मुरलीधर मोहोळ आणि पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पुण्यात घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.