महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाने उन्नतांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार देवतांच्या तारक आणि मारक नामजपांची केलेली निर्मिती !
प्रभु श्रीराम आणि मारुति यांची हिंदी भाषेतील आरती उपलब्ध
‘कुठलीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘सध्याच्या काळानुसार देवतांचे तारक आणि मारक तत्त्व कुठल्या प्रकारच्या नामजपांतून अधिक मिळू शकते’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून हे नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत. यासाठी कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक प्रयोग केले. त्यातून हे नामजप सिद्ध झाले आहेत. त्यामुळे हे नामजप केल्यावर त्यातून काळानुसार आवश्यक असे त्या त्या देवतेचे तारक किंवा मारक तत्त्व प्रत्येकाला त्याच्या भावाप्रमाणे मिळण्यास साहाय्य होईल.
हे नामजप, तसेच प्रभु श्रीराम आणि मारुति यांची हिंदी भाषेतील आरती ‘चैतन्य अॅप’ (सनातन चैतन्यवाणी) या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण यांचा अवश्य लाभ घ्यावा. या नामजपांविषयीची माहिती आपले कुटुंबीय, आप्त आणि स्नेही यांनाही सांगावी, जेणेकरून त्यांनाही याचा
लाभ घेता येईल.
हे नामजप पुढील लिंकवर उपलब्ध आहेत : https://www.sanatan.org/mr/a/519.html
‘सनातन चैतन्यवाणी’ अॅप डाऊनलोड करून आरती आणि नामजप ऐका : https://www.sanatan.org/Chaitanyavani
हे नामजप ऐकतांना आपणांस काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्यास आम्हाला अवश्य कळवा. आमचा पत्ता आहे, contact@sanatan.org
– कु. तेजल पात्रीकर