हिंदु जनजागृती समितीचा हिंदु संस्कृतीच्या प्रसाराचा प्रयत्न स्तुत्य ! महामंडलेश्वर पतित पावनदास महाराज
हरिद्वार येथील कुंभमेळ्यात हिंदु राष्ट्र संपर्क अभियान
हरिद्वार – हिंदु जनजागृती समितीकडून हिंदु संस्कृतीच्या प्रसाराचा स्तुत्य प्रयत्न केला जात आहे. हिंदूंनी कोणती उपासना करावी ? आपली संस्कृती कशी आहे ? याचा चांगल्या प्रकारे प्रसार या प्रदर्शनीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तुम्ही जे प्रयत्न करत आहात, त्या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत, असे आशीवर्चन सौराष्ट्र येथील महामंडलेश्वर पतित पावनदास महाराज यांनी दिले. येथे लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’ला महामंडलेश्वर पतित पावनदास महाराज यांनी भेट दिली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.
या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी त्यांचा सन्मान केला. या प्रसंगी समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली.