कोल्हापुरातील एका केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची झालेली गर्दी
कोल्हापूर – कोल्हापुरात दोन दिवसांच्या लसीच्या तुटवड्यानंतर २६ एप्रिल या दिवशी अनेक केंद्रांवर प्रचंड प्रमाणात गर्दी उसळल्याचे दिसून आले. या वेळी सामाजिक अंतराच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी लोक एकमेकांना खेटून उभारले होते. गर्दी आवरण्यासाठी पोलीस बंदोबस्त द्यावा लागत होता. गर्दी न होता सर्वांना लस मिळण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याच उपाययोजना केल्या जात नसल्याचे या निमित्ताने पुढे आले.