देहलीमध्ये ७० सहस्र रुपयांना रेमडेसिविर विकणार्या ३ मेडिकल दुकानदारांना अटक
संकटाच्या समयी लोकांना अशा प्रकारे लुटणार्यांना फाशीचीच शिक्षा करायला हवी !
नवी देहली – देशभरात रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करण्यात येत आहे. असे करणार्यांना अटक करण्यात आली होती. आता देहलीत रेमडेसिविर इंजेक्शन ७० सहस्र रुपयांना विकणार्या ३ मेडिकल दुकानदारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७ इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनचे ६ डोस द्यावे लागतात.
Delhi: 3 arrested for black marketing of Remdesivir, 7 vials seized. They used to sell Remdesivir at Rs 70,000 per piece. Case registered, probe on. 2 of them, Likhit Gupta & Anuj Jain ran medical stores in Daryaganj & Chandni Chowk respectively; the 3rd, Akash Verma’s a jeweller pic.twitter.com/p7aU0Bq7dJ
— ANI (@ANI) April 26, 2021