कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार, तर सांगली शहर येथे पावसाने नागरिकांना दिलासा !
कोल्हापूर – गेले अनेक दिवस उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना २५ एप्रिल या दिवशी सायंकाळी ५ नंतर झालेल्या पावसाने दिलासा दिला. कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला, तर सांगली शहर येथेही काही प्रमाणात पाऊस झाला. सोलापूर शहरात ढगाळ वातावरण होते; मात्र पावसाने हुलकावणी दिली. कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड, नेसरी, गडहिंग्लज, गारगोटी भागांत वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला.