पुणे जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी १० पथके तयार !
रेमडेसिविर इंजेक्शनची जादा दराने विक्री करणार्यांवर गुन्हा नोंद करण्यासमवेतच त्यांना त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक !
पुणे – रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार चालू झाल्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई करण्यासाठी १० पथके सिद्ध केली आहेत. आतापर्यंत पोलिसांनी इंजेक्शनची जास्त दराने विक्री केल्याच्या प्रकरणी ६ ठिकाणी कारवाया करून गुन्हे नोंद केले आहेत. तर ९ आरोपींना कह्यात घेतले आहे. रेमडेसिविर इंजेक्शनची जादा दराने विक्री करणार्या चिंचवड आणि भोसरी येथील चौघांना गुन्हे शाखेने कह्यात घेतले आहे. आरोपी हे इंजेक्शन ३७ सहस्त्र रुपयांना विकत असल्याचे समोर आले आहे.