पुण्यातील रुग्णालयांनी फायर सेफ्टी ऑडिट करून घेण्याचा अग्नीशमनदलाचा आदेश !
कोविड रुग्णालयांमध्ये अपघात झाल्यावर लेखापरीक्षणाचा आदेश देण्याऐवजी त्यासाठी कायमस्वरूपी कार्यपद्धत हवी !
पुणे – राज्यातील कोविड रुग्णालयांमध्ये अपघात होऊन रुग्णांचा बळी जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शासकीय, तसेच खासगी रुग्णालयांना अग्नीशमनदलाने सतर्कतेची चेतावणी दिली आहे. सर्व रुग्णालयांनी पुन्हा एकदा अग्नीसुरक्षेच लेखापरीक्षण करून घ्यावे, असा आदेश अग्नीशमनदलाने दिला आहे. शहरातील ऑक्सिजन आणि व्हेन्टिलेटर बेडवर उपचार घेणार्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने ऑक्सिजनचा साठा आणि अग्नीशमन यंत्रणा यांकडे लक्ष ठेवणे अनिवार्य झाले आहे. ज्या रुग्णालयांच्या अग्नीशमन यंत्रणा बंद असतील अशांना नोटीस देऊन कारवाई करण्याच्या सूचना अग्नीशमनदलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिले आहेत.