रेमडेसिविर इंजेक्शनची २२ सहस्र रुपयांना विक्री करणार्‍या ३ जणांना अटक !

मूख्य सूत्रधार एका खासगी कोविड रुग्णालयाचा कंपाऊंडर

बीड – येथे रेमडेसिविर इंजेक्शन २२ सहस्र रुपयांना विक्री केल्याच्या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ३ जणांना कह्यात घेतले आहे. यांना न्यायालयाने २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळ्याबाजाराचा मुख्य सूत्रधार हा एका खासगी कोविड रुग्णालयाचा कंपाऊंडर आहे. मित्राच्या साहाय्याने तो गरजू ग्राहकांना या इंजेक्शनची विक्री करत होता.

येथील शिवाजीनगर पोलिसांनी माने कॉम्प्लेक्स परिसरात सापळा रचून इंजेक्शन विक्री करतांना संतोष नाईकवाडे याला कह्यात घेतले होते. त्यानंतर झालेल्या चौकशीतून अन्य दोघांनाही अटक करण्यात आली आहे.