‘मिशन वायू’या उपक्रमाअंतर्गत ‘पी.पी.सी.आर्.’ देणार २५० व्हेंटिलेटर !
पुणे – मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (एम्.सी.सी.आय.ए.) आणि पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड १९ रिस्पॉन्स (पी.पी.सी.आर्.) यांनी ‘मिशन वायू’ या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात २५० व्हेंटिलेटर आणि ४ सहस्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स कोरोनाबाधित भागामध्ये देगणी स्वरूपात देण्यात येतील, अशी माहिती पी.पी.सी.आर्.ने दिली.
#PPCR & @MCCIA_Pune have arranged for procurement & donation of 250 BiPaPs & 4000 oxygen concentrators from Singapore to India under #MissionVayu. This will help save atleast 20k lives a week. We seek your generous support 🙏 @sudhirmehtapune @Girbane https://t.co/1vz1T8uT2P pic.twitter.com/RimVzVLOeH
— Pune Platform for COVID-19 Response (@ppcr_pune) April 24, 2021
‘मिशन वायू’ उपक्रमांतर्गत व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्ससारखी क्रिटिकल केअर उपकरणे सरकारी आणि खासगी रुग्णालयांना विनामूल्य दिली जाणार आहेत. यातून दर आठवड्याला १५ ते २० सहस्र रुग्णांना याचा लाभ मिळेल. पुणे जिल्ह्यात विविध सरकारी आणि खासगी रुग्णालयात १२ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी ‘पी.पी.सी.आर्.’च्या वतीने १० ते १२ कोटी रुपयांचा निधी संकलित केला आहे. त्यामुळे येत्या काळात सहस्रो रुग्णांना जीवदान मिळेल, असा विश्वास ‘पी.पी.सी.आर्.’ने व्यक्त केला आहे.