धुळेर, म्हापसा येथील एका हिंदु महिलेची धर्मांध व्यक्तीकडून गेल्या २-३ वर्षांपासून सतावणूक चालूच !
|
म्हापसा, २५ एप्रिल (वार्ता.) – डांगी कॉलनी, धुळेर, म्हापसा येथील एका सदनिकेत (अपार्टमेंटमध्ये) वास्तव्यास असलेल्या विधवा हिंदु महिलेला मूळचा कर्नाटक येथील आणि सध्या पेडे, म्हापसा येथे रहाणारा फळविक्रेता सय्यद मुस्तफा गेल्या २-३ वर्षांपासून सतावत आहे. सदर महिलेला अश्लील संदेश पाठवणे आणि अश्लील शिवीगाळ करणे, महिला घरातून बाहेर पडल्यावर किंवा कामावरून घरी येतांना तिचा पाठलाग करणे, सार्वजनिक ठिकाणी महिलेला अभद्र शिव्या देऊन तिची प्रतिमा मलीन करणे, तसेच महिलेला अन् तिच्या १२ वर्षांच्या मुलीला जिवे मारण्याची धमकी देणे, अशा विविध प्रकारे सय्यद मुस्तफा संबंधित महिलेला सतावत आहे.
(परराज्यातून येऊनही एका महिलेला अशा प्रकारे सतावणार्या धर्मांधाला हे बळ कुठून मिळते ? पोलिसांचा या धर्मांधाला कोणताही धाक नाही का ? धर्मांध संघटित असल्यामुळे ते अशा प्रकारे त्रास देण्यास धजावतात. हिंदूंनीही घटनात्कम मार्गाने आणि संघटितपणे अशांना खडसावले पाहिजे ! – संपादक) संबंधित महिलेने सय्यद मुस्तफा याच्या विरोधात पोलिसांत अनेक वेळा तक्रारी केल्या; मात्र त्याचा लाभ झाला नाही. (असे पोलीस काय कामाचे ? संबंधितांची त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करायला हवी ! – संपादक) यानंतर संबंधित महिलेने हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संपर्क साधून त्यांच्याकडे आपली व्यथा मांडली. (पीडित हिंदु महिलांना पोलिसांचा नाही, तर हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा आधार वाटतो, हे लक्षात घ्या ! – संपादक) हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या तक्रारीची त्वरित नोंद घेऊन संबंधित महिलेला तात्काळ संरक्षण पुरवण्यासाठी म्हापसा पोलिसांना निवेदन सादर केले. या निवेदनावर हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री जयेश नाईक, श्याम नागवेकर, जयेश थळी आणि प्रशांत वाळके यांच्या स्वाक्षर्या आहेत.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात हिंदुत्वनिष्ठांनी म्हटले आहे की, संबंधित महिलेला सतावणार्या सय्यद मुस्तफा याच्या विरोधात महिलेने ७ वेळा पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत आणि सय्यद मुस्तफा याच्या विरोधात पोलिसांत २ प्रथमदर्शनी गुन्हे (एफ्.आय.आर्.) नोंद झालेले आहेत. सध्या सय्यद मुस्तफा जामिनावर सुटलेला आहे. संबंधित महिलेचा पती हयात असल्यापासून आणि आता तिच्या पतीचे निधन झाल्यानंतरही सय्यद मुस्तफा त्यांची छळवणूक करत आहे. संबंधित महिलेला १२ वर्षांची मुलगी आहे आणि तिलाही जिवे मारण्याची धमकी सय्यद मुस्तफा याने दिली आहे. या पार्श्वभूमीवर सय्यद मुस्तफा याला त्वरित अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी आणि संबंधित महिलेला सुरक्षा पुरवावी.
म्हापसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी हिंदुत्वनिष्ठांची बाजू ऐकून घेऊन त्वरित संबंधित महिलेला सुरक्षा पुरवण्यासाठी ३ महिला पोलीस साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचे संपर्क क्रमांक पीडित महिलेला दिले आणि आवश्यकता भासल्यास त्यांना संपर्क करण्यास सांगितले, तसेच सय्यद मुस्तफा यांना पोलीस ठाण्यात बोलावणार असल्याचे, तसेच या प्रकरणी पुढील कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी सांगितले. (धर्मांधांच्या संदर्भात पोलीस अशी मवाळ भूमिका का घेतात ? एखाद्या महिलेला धमकावणे, तिचा पाठलाग करणे हे गंभीर गुन्हे नाहीत का ? – संपादक)