दळणवळण बंदीमुळे महाराष्ट्राची ८२ सहस्र कोटी रुपयांची हानी होण्याची शक्यता !

लोकहो, कोरोनानंतर भेडसावणार्‍या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठीही सिद्ध व्हा !

मुंबई – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दळणवळण बंदी आणि निर्बंध यांमुळे देशाची किमान दीड लाख कोटी रुपयांची, तर राज्याची किमान ८२ सहस्र कोटी रुपयांची हानी होईल, असा अंदाज स्टेट बँक ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे. या निर्बंधांमुळे औद्यागिक उत्पादनात, तसेच सकल राष्ट्रीय उत्पन्नातही घट होण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. जीडीपी दरही १० ते १४ टक्के न्यून होण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांची ८० टक्के हानी होईल. महाराष्ट्र हे औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या पुढारलेले राज्य असल्याने महाराष्ट्राला अधिक मोठा फटका बसू शकतो.