नागपूर येथे माजी मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनामुळे निधन
चंद्रपूर – जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय देवतळे यांचे कोरोनामुळे २५ एप्रिल या दिवशी निधन झाले. ते नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. ते सातत्याने भद्रावती-वरोरा मतदार क्षेत्रांतून निवडून येत होते. संजय देवतळे यांनी काँग्रेसच्या कार्यकाळात सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री म्हणून काम पाहिले होते. वर्ष २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. वर्ष २०१९ ची निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढवली होती. पराभूत झाल्यावर त्यांनी नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता.