स्वभावदोष निर्मूलन सत्संग घेतांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुलिका शर्मा यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट !

‘श्रीगुरुकृपेने दळणवळण बंदीच्या कालावधीत ७.४.२०२० या दिवशी झारखंड, बंगाल आणि पूर्वोत्तर भारत येथील साधकांसाठी स्वभावदोष निर्मूलन सत्संगाचा आरंभ झाला. हा साप्ताहिक सत्संग मागील एक वर्षापासून अव्याहत चालू आहे. २६.४.२०२१ या दिवशी या वर्गाला तिथीनुसार एक वर्ष पूर्ण होत आहे. (चैत्र कृष्ण पक्ष चतुर्दशी (२६.४.२०२१) या दिवशी कु. मधुलिका शर्मा यांचाही वाढदिवस आहे.) हा सत्संग घेतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे कृतज्ञतास्वरूप गुरुचरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करत आहे.

कु. मधुलिका शर्मा

कु. मधुलिका शर्मा यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. ‘जीवनाचा कायापालट करणार्‍या स्वभावदोष निर्मूलन या दैवी प्रक्रियेचा साधकांनी आनंद घेऊन जलद आध्यात्मिक उन्नती करावी’, या उद्देशाने सत्संग घेण्यास आरंभ करणे

वर्ष २००३ पासून गुरुदेवांनी साधकांना स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया शिकवली आहे; परंतु ‘ही प्रक्रिया अजूनही आम्हा साधकांकडून चांगल्या प्रकारे होत नाही’, असे माझ्या लक्षात आले. अनेक वेळा सारणीतील सर्व रकाने न भरल्यामुळे आणि योग्य प्रकारे स्वयंसूचना न बनवल्यामुळे साधकांना स्वतःमध्ये पालट जाणवत नाहीत. त्यामुळे त्यांना ही प्रक्रिया कठीण वाटते आणि ‘त्याविषयी त्यांच्या मनात एक प्रकारची उदासीनता आहे’, असेही माझ्या लक्षात आले. त्यामुळे ‘ही दैवी प्रक्रिया सर्व साधकांनी चांगल्या प्रकारे शिकून जीवनाचा कायापालट करणार्‍या प्रक्रियेचा आनंद घ्यावा आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी साधकांचे जलद गतीने प्रयत्न व्हावेत’, हा उद्देश ठेवून साधकांसाठी दळणवळण बंदीच्या कालावधीत या सत्संगाचा आरंभ झाला.

२. संतांचा संकल्प, अस्तित्व आणि आशीर्वाद यामुळे या स्वभावदोष निर्मूलन सत्संगाचा अनेक साधकांना पुष्कळ लाभ होऊन त्यांची व्यष्टी अन् समष्टी साधना चांगली होत असणे

आरंभी या सत्संगामध्ये मनाचे निरीक्षण करणे, दिवसभराच्या वेळेचे नियोजन करणे, स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याच्या (सारणी लिखाणापासून ते स्वयंसूचनेच्या वेगवेगळ्या पद्धती) सैद्धांतिक माहितीसह त्याचा प्रायोगिक भाग घेण्याचा प्रयत्न केला. संतांचा संकल्प, त्यांचे अस्तित्व आणि आशीर्वाद यांमुळे या सत्संगाचा अनेक साधकांना पुष्कळ लाभ होत आहे. काही साधकांची स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आरंभ झाली असून त्यांच्या मनाच्या स्थितीमध्ये पालट झाले आहेत. त्यांची व्यष्टी साधना चांगली होऊ लागली आहे आणि त्यामुळे त्यांच्या समष्टी सेवेतील सहभागसुद्धा पुष्कळ वाढला आहे.

३. श्रीकृष्णाने स्वभावदोष निर्मूलन सत्संग घेण्याची संधी देऊन दिलेली वाढदिवसाची अनमोल भेट !

गुरुदेवांच्या कृपेने मला हा सत्संग घेण्याची सेवा मिळाली. मागील वर्षी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हा सत्संग आरंभ झाला. त्या दिवशी सकाळीच मी श्रीकृष्णाला विचारले, ‘आज तू मला कुठली भेट देणार आहेस ?’ श्रीकृष्णाने मला हा सत्संग घेण्याची भेट दिली. या अनमोल भेटीने माझ्यामध्ये जो पालट झाला, त्यावर माझा विश्‍वासच बसत नाही. ‘हे केवळ आणि केवळ गुरुकृपेनेच शक्य होऊ शकते’, याची जाणीव या अज्ञानी जिवाला होत आहे.

४. अनुभूती

४ अ. स्वभावदोष निर्मूलन सत्संगात विषय घेतांना ‘कुठल्या चुका होऊ शकतात ?’, यावर रात्री स्वप्नात संतांचे मार्गदर्शन मिळणे : एका सप्ताहाच्या कालावधीत २ – ३ वेळा मला रात्री स्वप्नात कधी सद्गुरु पिंंगळेकाका (सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे), कधी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, तर कधी पू. नीलेश सिंगबाळ ‘पुढील सप्ताहातील विषयाशी संबंधित माझ्या चुकांचा प्रसंग सांगून मला योग्य दृष्टीकोन सांगत आहेत’, असे दिसायचे. तेव्हा त्यांच्याकडून मिळत असलेल्या मार्गदर्शनामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटायची.

४ आ. सत्संगात बोलतांना स्वतः बोलत नसून तो आवाजही निराळा जाणवणे : सत्संगात विषय मांडतांना ‘मी बोलत नसून माझ्या माध्यमातून दुसरेच कुणीतरी बोलत आहे’, असे मला वाटायचे. सत्संगाच्या वेळी येणारा माझा आवाज आणि इतर वेळी असणारा माझा आवाज यांमधील भेद माझ्या लक्षात यायचा. या सत्संगांमुळे माझा या विषयाचा अभ्यास होऊन तो विषय सादर करण्याचा आत्मविश्‍वासही वाढला आहे.

४ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून मार्गदर्शन होणे : हा सत्संग घेण्यासाठी अभ्यास करतांना माझी पुष्कळ भावजागृती होते. ‘गुरुदेवांनी किती खोलवर अभ्यास करून स्वभावदोष निर्मूलनाची प्रक्रिया सोप्या स्वरूपात आम्हाला सांगितली आहे’, हे पाहून माझे मन कृतज्ञतेने भरून येते. काही वेळा ‘मी बसलेल्या आसंदीच्या मागे उभे राहून गुरुदेव मला ‘काय लिहायचे ?’ ते सांगत आहेत किंवा कधी माझ्या शेजारी बसून मार्गदर्शन करत आहेत’, असे मला जाणवते.

५. जाणवलेले पालट !

५ अ. दुपारी झोपायची पुष्कळ सवय असूनही सेवा पूर्ण केल्याविना न झोपणे : मला दिवसा झोपण्याची सवय होती. कितीही व्यस्तता असली, तरीही मी झोपण्यासाठी वेळ काढायचेे; परंतु आता माझी साधनेची सूत्रे आणि सेवा पूर्ण होत नाही, तोपर्यंत मला झोप येत नाही. दिवसभर करायच्या नियोजनातील सेवा अपूर्ण ठेवून मी झोपायला गेले, तर मला आतून ‘आधी ते पूर्ण कर’, असे कुणीतरी सांगत आहे’, असे जाणवायचे. कधी ‘उठल्यानंतर करू’, अशी सवलत घेण्याचा विचार आल्यानंतरसुद्धा मी लगेच उठून प्रथम सेवेलाच प्राधान्य देते. ‘मी असे करू शकते’, यावर माझाच विश्‍वास बसत नाही आणि माझ्या आई-बाबांनाही याचे पुष्कळ आश्‍चर्य वाटते.

५ आ. स्वभावदोष निर्मूलन सत्संग घेण्याची संधी देऊन एकलकोंडा स्वभाव आणि सर्वांसमोर बोलण्याची भीती जाणे : माझे भौतिकशास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण (Masters in Physics) झाले आहे. सर्वांना वाटते, ‘मी प्राध्यापकाची चाकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत’; परंतु एकलकोंडा स्वभाव आणि सर्वांसमोर बोलण्याची भीती वाटत असल्यामुळे मी ते टाळले. ‘मी कधी कुणाला एखादी गोष्ट समजावून सांगू शकत नाही’, असे मला वाटायचे. मी साधकांशीही फारसे बोलायचे नाही; परंतु गुरुदेवांनी माझा हा स्वभावदोष दूर करण्यासाठीच मला हा सत्संग घेण्याची संधी दिली. आता मला साधकांप्रती पुष्कळ आपुलकी वाटते आणि ‘साधकांनी मनमोकळेपणाने बोलावे’, यासाठी ‘मी त्यांना कसे साहाय्य करू ? त्यासाठी कसे प्रयत्न करू ?’, असे मला आता आतून वाटते. आपोआपच माझ्याकडून तसेे प्रयत्न होतात. गुरुदेवांच्या कृपेने या सेवेच्या माध्यमातून तेच मला साधकांसाठी आवश्यक असलेली सूत्रे सुचवतात.

५ इ. व्यक्तीनिष्ठतेकडून तत्त्वनिष्ठतेकडे नेणे : आरंभी मी एका उत्तरदायी साधकाशी मोकळेपणे बोलायचे; पण ‘इतर कुणाशी मी मनमोकळेपणाने बोलू शकत नाही’, असे मला वाटायचे. गुरुदेवांनी शंभूदादा (श्री. शंभू गवारे), पू. नीलेश सिंगबाळ, पू. खेमकादादा आणि पू. (सौ.) खेमकाताई यांच्या माध्यमातून मला तत्त्वनिष्ठ रहायला शिकवले.

६. कृतज्ञता

या सत्संगाच्या माध्यमातून गुरुदेवांनी या अज्ञानी जिवावर कृपा केली आणि मला अंतर्मुख बनवून जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त केले. यासाठी मी शब्दांतून कृतज्ञता करू शकत नाही !

गुरुकृपा की वर्षा में भीगे हर क्षण ।

मन में, विचारों में, कृति में, दृष्टि में ।
एक-एक कोशिका में, गुरुदेव बस रहें आप ।
गुरुचरणों में समर्पित हो हर एक श्‍वास ।
यही है अब जीवन का ध्यास ॥ १ ॥

सिर पर रहे, प.पू. का हाथ ।
साधना पथ पर बढें सब साथ ।
दोष-अहं का कर सकें त्याग ।
प्रीति-शरणागति हो आत्मसात ॥ २ ॥

हर एक साधक में हो गुरुदेव आपके दर्शन ।
बने मन इतना निर्मल व पावन ।
हृदयमंदिर में अखंड रहें गुरुचरण ।
गुरुकृपा की वर्षा में भीगे हर क्षण ॥ ३ ॥

– गुरुचरणों में समर्पित,

कु. मधुलिका शर्मा, झारखंड (७.४.२०२१)


स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचा ‘ऑनलाईन’ सत्संग घेतांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या कु. मधुलिका शर्मा यांच्यामध्ये झालेले पालट !

२६.४.२०२१ या दिवशी झारखंड येथील साधिका कु. मधुलिका शर्मा यांचा वाढदिवस आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या कृपेने मला मागील २ वर्षांपासून मधुलिकाताईंसह सेवा करण्याची संधी मिळाली. या कालावधीत व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा करतांना मधुलिकाताईंमध्ये पुष्कळ पालट झाल्याचे माझ्या लक्षात आले. ते गुरुचरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करत आहे.

श्री. शंभू गवारे

१. सकारात्मकता वाढणे

पूर्वी मधुलिकाताईंच्या मनामध्ये स्वतःविषयी नकारात्मक विचार असायचे; मात्र मागील २ वर्षांत त्यांनी या स्वभावदोषावर पुष्कळ कठोरतेने प्रयत्न केल्यामुळे आता त्यांच्या मनात स्वतःविषयी नकारात्मक विचार नसतात. त्या साधनेसाठी आवश्यक असलेल्या पंचसूत्रींचे (विचारणे, ऐकणे, स्वीकारणे, शिकणे आणि कृती करणे) मनापासून पालन करतात. त्यांच्यामध्ये ‘विचारणे आणि ऐकणे’ हे गुण वाढले आहेत.

२. आत्मविश्‍वासात वाढ होणे

पूर्वी ‘मला चांगले बोलता येत नाही आणि समाजाच्या समोर जाऊन बोलायला भीती वाटते’, असे त्यांना वाटायचे. त्यामुळेच त्या या सगळ्यांपासून दूर रहायच्या. दळणवळण बंदीच्या कालावधीमध्ये गुरुदेवांनी त्यांच्याकडून या संदर्भात पुष्कळ चांगले प्रयत्न करवून घेतले. त्या वेळी आम्ही समाजासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचा अभ्यासवर्ग चालू केला. तो वर्ग त्या अत्यंत भावपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि आत्मविश्‍वासाने घेतात. त्यांच्या वर्ग घेण्याच्या पद्धतीमुळे केवळ साधकांमध्येच नाही, तर समाजातील लोकांमध्येेही स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेची आवड निर्माण झाली असून त्यांना स्वतःमध्येही पालट झाल्याचे जाणवत आहेत.

३. इतरांचा विचार करणे

पूर्वी सेवा करतांना मधुलिकाताई केवळ स्वतःच्याच सेवेचा विचार करायच्या. त्यांच्या मनात इतर सेवेविषयी विचारच यायचे नाहीत आणि त्यांना ‘हे चुकीचे आहे’, याची जाणीवही फार अल्प असायची. आता त्या या स्वभावदोषावर मात करून स्वतःमध्ये व्यापकत्व निर्माण करण्यासाठी चांगले प्रयत्न करत आहेत. आता त्या इतरांच्या सेवांचा विचार करून त्यामध्ये त्यांना साहाय्यही करतात.

४. स्वतःला पालटण्याची तळमळ

त्यांना साधकांशी सेवेच्या संदर्भातही बोलायला फारसे आवडत नव्हते आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांच्या मनाची सिद्धताही नव्हती. समष्टी सेवेचे महत्त्व लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यासाठी कृतीच्या स्तरावर प्रयत्न करायला आरंभ केला. आता त्या स्वतःहून साधकांशी बोलतात. त्यामुळे साधकांनाही त्यांच्याविषयी जवळीक वाटते आणि त्यांचा आधार वाटतो. गुरुदेवांच्या कृपेने त्यांच्यात हा मोठा पालट झाला आहे.’

५. उनको अपना आशीर्वाद रूपी उपहार दिया ।

मधुलिका दीदीने किए हैं स्वयं में बदलाव ।
दोषों के सामने नहीं मानी उन्होंने हार ।
देखकर उनके प्रयास, गुरुदेवजी ने जन्म-मृत्यु के चक्र से मुक्त किया ।
उनको अपना आशीर्वाद रूपी उपहार दिया ॥ १ ॥

दीदी में है भाव, जिससे उन्होंने जीता साधक एवं संतों का मन ।
श्रीगुरुचरणों में एक ही प्रार्थना ।
करवा लें दीदी से आगे की प्रगति बनाकर उनका साधनामय हर क्षण ॥ २ ॥

– श्री शंभू गवारे, कोलकाता (७.४.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक