आता तूच ये सत्वरी ।
पंढरीच्या विठ्ठला । एक विनवणी तुला ।
पाय गेले, हात गेले । कशी करू तुझी वारी ।
संसारातून मुक्त जाहलो । आता तूच ये सत्वरी ॥ १ ॥
रखुमाईचा पती । कटीवरी हात ठेवूनी उभा ।
नामदेवाच्या देवा । किती हाक मारू रे तुला ।
थकलो देवा आता । संत जमले चंद्रभागेच्या तिरी ।
आता तूच ये सत्वरी ॥ २ ॥
इंद्रायणी नदीत । बुडविली तुकोबांची गाथा ।
प्रसन्न जाहली जलदेवता । तरंगली गाथा ।
माझे मन तुझ्याच रे चरणी । आता तूच ये सत्वरी ॥ ३ ॥
भक्त दामाजीसाठी । झालास तू विठू ।
लाज राखिली दामाजीची तू । आनंदली पंढरी ।
आता तूच ये सत्वरी ॥ ४ ॥
– श्री. सुधाकर के. जोशी (वय ९२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.