उमाळा (जिल्हा बुलढाणा) येथे ९० कोरोनाबाधितांमुळे संपूर्ण गाव ‘कंटेन्मेंट झोन’ म्हणून घोषित !
बुलढाणा – तालुक्यातील ६०० लोकसंख्या असलेल्या उमाळा या गावात ९० जणांचा कोरोना अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. यामुळे संपूर्ण गाव ‘कंटेन्मेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. सर्व नागरिकांची कोरोनाची चाचणी केली जात आहे. अनेक कुटुंबांतील सदस्यांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे जाणवत होती; परंतु कुणाचीही कोरोनाची चाचणी करण्यात आली नाही. स्थानिक रुग्णालयात जाऊन उपचार करून रुग्ण घरीच थांबत होते. आरोग्य प्रशासनाने कोरोना चाचणीला प्रारंभ केल्यानंतर लोकांचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले. (आरोग्य प्रशासनाला उशिरा सुचलेले शहाणपण ! – संपादक)